sangli murdar news : सांगलीत दिवाळीच्या पहाटेच दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून

SHARE:

sangli murdar news : सांगलीत दिवाळीच्या पहाटेच दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून : दिवाळीच्या सुरवातीलाच संजयनगर आणि कारखाना परिसर तरुणाच्या खुनाने हादरला. दारू पाण्यावरून झालेल्या भांडणातून मित्रांनी मिळून दगडाने डोके थॅचत तरुणाचा खून केला. सदर खुनाची घटना हि आज शनिवार दि. 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास माधवनगर रोडवरील वसंतदादा औद्योगिक वसाहत परिसरात घडली. रोहित लक्ष्मण आवळे (वय 24 रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी, सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

sangli murdar news : सांगलीत दिवाळीच्या पहाटेच दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून

घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी संशयित आदेश मधुकर डोईफोडे (वय 24, रा. चिंतामणीनगर, झोपडपट्टी) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत रोहित आवळे हा मजुरीचे काम करतो. तसेच संशयित आदेश हा देखील किराणा दुकानात मजुरीचे काम करत होता. दोघेही एकाच झोपडपट्टीत राहत होते. त्यामुळे त्यांची ओळख होती. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता अशी परिसरात चर्चा होती.

शुक्रवारी रात्री रोहित, आदेश आणि परिसरात चौघे दारू पिण्यासाठी एकत्र जमले होते. वसंतदादा औद्योगिक वसाहतीमध्ये उडपी हॉटेल आणि बीएसएनएलच्या ऑफीसजवळ एका पडक्या इमारतीसमोर अंधारात बसून चौघांनी दारू प्यायली. त्यांच्यात गप्पा सुरू होत्या. काहीवेळानंतर दोघे साथीदार निघून गेले. तेव्हा रोहित आणि आदेश हे दोघेच थांबले होते. नशेत असताना त्यांच्यात वादावादी झाली. त्यांचा वाद वाढत गेल्यानंतर एकमेकांना ठेवत नाही अशी धमकी दिली. तेव्हा आदेश याने रोहितला मारहाण करण्यास सुरूवात केली. तो खाली पडल्यानंतर दगडाने त्याचे डोके ठेचले.

तो निपचिप पडल्यानंतर आदेश तेथून निघून गेला. दरम्यान, वसाहतीमध्ये रात्रपाळीला असलेल्या काही कामगारांना दोघांचा गोंधळ ऐकू आला. त्यामुळे परिसरात गर्दी जमली. मध्यरात्रीनंतर सव्वाच्या सुमारास संजयनगर पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी औद्योगिक वसाहतीमधून जात होती. तेव्हा त्यांना बीसएनएल ऑफीसजवळील पडक्या इमारतीसमोर गर्दी दिसली. त्यामुळे पोलिस तेथे आले. त्यांनी गर्दी हटवली. पाहणी केल्यानंतर मृत तरूण पालथ्या स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पडला होता. चौकशी केल्यानंतर मृत तरूणाचे नाव रोहित आवळे असल्याचे समजले. संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम यांना हा प्रकार कळवला. ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या नातेवाईकांना कळवले. संशयिताचा शोध घेण्यास पोलिस पथके रवाना झाली. संजयनगर पोलिसांनी तातडीने चौघांना ताब्यात घेतले.

चौकशीत आदेश डोईफोडे याने वादातून खून केल्याची कबुली दिली. त्याला अटक केली. इतर दोघांचा खुनात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. परंतू त्यांची कसून चौकशी करून जबाब नोंदवण्यात आले आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *