sangli mahapalika news : मदन पाटील गटाच्या माजी नगरसेवकांना भाजपची उमेदवारी

SHARE:

sangli mahapalika news : मदन पाटील गटाच्या माजी नगरसेवकांना भाजपची उमेदवारी   महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेले आणि जयश्रीताई पाटील यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना पक्षाची उमेदवारी दिली जाईल, कोणाला डावलले जाणार नाही. 2018 मधील आमच्या मूळ भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाणार आहे. काही बदल असतील, पण ते आरक्षण जाहीर झाल्यानंतर निश्चित होती, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

sangli mahapalika news : मदन पाटील गटाच्या माजी नगरसेवकांना भाजपची उमेदवारी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी जिल्हा बॅँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जनसुराज्यचे समित कदम, सुरेश आवटी, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांच्यासह मदनभाऊ गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जयश्रीताई पाटील व माजी नगरसेवकांकडून आढावा घेतला. महापालिकेवर पुन्हा भाजप महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे. यासाठी आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना केल्या. तर गेल्या निवडणुकीत भाजप व मदनभाऊ पाटील गटातून विजयी झालेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी शंभर दिली जाणार आहे. त्यांनी कामाला लागावे.

तसेच निवडणुकीपर्यंत जे कोणी अन्य पक्षातील विद्यमान माजी नगरसेवक पक्षात येतील त्यांनाही उमेदवारी दिली जाईल. शिवाय मूळ भाजपच्या माजी नगरसेवकांना देखील उमेदवारी दिली जाणार आहे. पण आरक्षण सोडतीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक प्रकाश मुळके, रोहिणी पाटील, प्रशांत पाटील, कांचन कांबळ, निरंजन आवटी, संदीप आवटी, किशोर जामदार, किशोर शहा, संग्राम पाटील, प्रशांत मजलेकर, मृणाल पाटील, मदनभाऊ युवा मंचचे कार्याध्यक्ष शीतल लोंढे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

गजानन मगदूम भाजपमध्ये

माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी भजापमध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणूकीत ते अपक्ष विजयी झाले होते, नंतर त्यांनी भाजपला पाठींबा दिला होता. ते भाजपसाबेतच काम करत होते आता त्यांनी अधिकृत पक्ष प्रवेश केला. पालकमंत्री पाटील यांनी मगदूम यांचीही उमेदवारी भाजपकडून नक्की असल्याचे जाहीर केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *