अजित पवार
shirol election news : शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सत्तेत असणारे आणि सत्तेच्या विरोधात असणारे सर्वच पक्षाचे नेते आता जोमाने कामाला लागले आहेत. सत्तेच्या सारीपाटावर आपली गळचेपी होत असेल तर पर्यायी 39; एकला चलो रे39; ची भूमिका ठेवून नेते कामाला लागले आहेत.
shirol election news : शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले
चलो रे एकला ..नेते लागले कामाला
यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या जोडण्यांना तालुक्यात उत आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होईल. यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे निवडणुकीची लगभग सुरू झाली आहे.
राज्याच्या सत्तेत महायुती म्हणजेच भाजप अजित पवार गट राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे गट शिवसेना व मित्रपक्ष एका बाजूला आणि विरोधी गटाकडून राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे गट शिवसेना व मित्रपक्ष असे निवडणुकांचे समीकरण असणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे एकमेकांच्या विरुद्ध समीकरण असले तरी गटतट आणि जातीय समीकरणे या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत.
शिरोळ तालुक्याच्या राजकीय सत्ता संघर्षात मात्र चित्र वेगळेच आहे. विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजर्षी शाहू विकास आघाडी, भाजपा एकनाथ शिंदे गट शिवसेना मित्रपक्ष असे तर महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना, उद्धव ठाकरे गट शिवसेना व त्यांचे मित्रपक्ष असे निवडणुकीला सामोरे जाण्याचे संकेत आहेत.
पण कुरघोडीच्या राजकारणामुळे आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे याकरिता सर्वच पक्षाचे नेते ताकद पणाला लावताना दिसत आहेत. काँग्रेसची धुरा दत्त कारखान्याचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांच्या खांद्यावर आहे. सर्व पक्षांचे आणि गटातटांचे प्रमुख हे आपल्या उमेदवाराचा पट कसा निघेल याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील असे राजकीय जाणकारातून बोलले जात आहे. पण गट तट आणि जातीय समीकरणाचे वलय असलेल्या शिरोळ तालुक्यात मात्र कोण बाजी मारणार याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
आपल्या पक्षाचा उमेदवाराला पाठबळ मिळाले नाही तर आपण एकला चलो ची भूमिका घ्यायची असे काही राजकीय नेते मंडळी सुतोवाच करताना दिसत आहेत. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे. मोजक्याच कार्यकर्त्यांना या चाचणीच्या मोहिमेवर कार्य करण्यास सांगितले असल्याचे बोलले जात आहे.
अन्यथा ताकद दाखवू..
महायुतीच्या सर्वच नेत्यांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा सध्यातरी पवित्रा घेतला आहे पण यामध्ये काही दगाफटका झाला तर एकला चलो रे ची भूमिका घेऊन आपण ताकद दाखवण्यासाठी सज्ज रहावे असे नेतेमंडळी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देत असल्याची चर्चा शिरोळ तालुक्यात रंगू लागली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











