sangli news : रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी

SHARE:

sangli news : रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी : येथील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच औषध व्यापार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.

sangli news : रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी

दिल्ली येथील नीती आयोगाच्या मान्यताप्राप्त सॉक्रेटिस सामाजिक संशोधन विद्यापीठाच्यावतीने रावसाहेब पाटील यांच्या आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

मुंबईत मानद डॉक्टरेट पदवी प्रदान सोहळा दिलासा फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. मानद डॉक्टरेट पदवी अग्रवाल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. विजय पंडित, दिलासा फाउंडेशनचे सचिव पद्मिनी कृष्णा यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी श्रीचंद केसवानी, ए.पी.टी. रिसर्च फाउंडेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. मुकुंद बोधनकर, डॉ. शशी धरण, योगेश शर्मा तसेच डॉ. दीपक खांडेकर, कुमार नायर प्रमुख उपस्थित होते.

ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जीवनप्रवास सुरु करून स्वतःचे स्वतंत्र व प्रेरणादायी विश्व उभारणार्‍या पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. हा सन्मान रावसाहेब पाटील यांनी आपल्या पत्नी कांचन पाटील व सागर पाटील यांच्या उपस्थितीत स्वीकारला. याप्रसंगी विद्यापीठ व दिलासा फाउंडेशनच्यावतीने पाटील यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याची माहिती देत त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

यापूर्वी मिळालेल्या विविध पुरस्कारांबरोबर मानद डॉक्टरेट पदवीमुळे समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *