sanjaykaka patil news : पावसाचा अहवाल बदलला; कृषी सहाय्यक व वीमा कंपनीची मिलीभगत: संजयकाका पाटील : विसापूर व येळावी सर्कलमध्ये प्रत्यक्षात 51 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला असताना तो कमी दाखवून शेतकर्यांची फसवणूक केली जात आहे. यामध्ये कृषी सहाय्यक व विमा कंपनीची मिलीभगत आहे. या प्रकरणी कृषीमंत्र्यांकडे तक्रार करून चौकशी मागणी करणार असल्याचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
sanjaykaka patil news : पावसाचा अहवाल बदलला; कृषी सहाय्यक व वीमा कंपनीची मिलीभगत: संजयकाका पाटील
कृषी मंत्र्यांकडे तक्रार करणार
ते म्हणाले, दि. 22 एप्रिल रोजी विसापूर, येळावी या भागात मोठा पाऊस झाला. या सर्कलमध्ये द्राक्ष बागांची संख्या प्रचंड आहे. या शेतकर्यांनी द्राक्षाचा विमा काढला आहे. पावसाच्या नोंदी घेण्यासाठी स्कायमेट वेदर स्टेशन कंपनीने जागोजागी हवामान केंद्रे उभी केली आहेत.
त्यावर पाऊस किती झाला याच्या नोंदी होतात. या काळात 51 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर शेतकर्यांना प्रतिगुंठा 3800 रुपये भरपाई देणे अपेक्षित आहे. दि. 22 एप्रिलच्या पावसाची त्या भागातील शेतकर्यांनी प्रत्यक्ष हवामान केंद्रावर जाऊन नोंद घेतली, तेंव्हा विसापूर येथे 59.8 मिलीमीटर तर येळावी येथे 59.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
कृषी सहायकाने मात्र याच केंद्रावरील पावसाचा दि. 6 मे रोजी एक अहवाल पाठवला, त्यात विसापूरला 38.03 तर येळावीत 40.3 मिलिमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आलेली आहे. या अहवालाच्या आधारे विमा कंपनी ही शेतकर्यांना अत्यंत कमी प्रमाणात मोबदला देणार आहे. यात सरळ सरळ शेतकर्यांची फसवणूक झालेली असल्याचा आरोप संजयकाका पाटील यांनी केला.
ज्या ठिकाणी द्राक्ष बागांची संख्या कमी आहे अशा ठिकाणी अचूक पाऊस दाखवला जातो आणि तिथे मदत देखील दिली जाते. जिथे द्राक्ष बागांची संख्या अधिक आहे तेथे मात्र पावसाच्या नोंदी मध्ये घोटाळा केला जातो असे गेल्या काही वर्षात निदर्शनास आले आहे. त्याचे पुरावेस आम्ही कृषी मंत्र्यांकडे सादर करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य महेश पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील, अमित पवार उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










