sharad lad news : शरद लाड मंगळवारी भाजपमध्ये, ‘पुणे पदवीधर’साठी भाजपकडून मिळणार उमेदवार : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचा भाजप पक्षप्रवेश निश्चित झाला असून दोन दिवसात होणार्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यावर शिक्कामोतर्ब होणार आहे. तर मंगळवार दि. 7 रोजी त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.
sharad lad news : शरद लाड मंगळवारी भाजपमध्ये, ‘पुणे पदवीधर’साठी भाजपकडून मिळणार उमेदवार
त्यामुळे आगामी होणार्या पुणे पदवीधर विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शरद लाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत भापजने जोरदार मुसंडी घेतली होती. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभागृहात ताकद वाढविण्यासाठी आता प्रयत्न होताना दिसत आहेत.
त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद वाढविणे, पदवीधर व शिक्षक उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघासाठी पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदान नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपकडून या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. गेल्यावेळी या मतदारसंघात भाजपला धक्का बसला होता.
आ. अरूणअण्णा लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला होता. यावेळी आ. अरूणअण्णा लाड यांचे सुपुत्र शरद लाड पदवीधर निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांच्यावर चार महिन्यांपासून गळ टाकण्यास भाजपने सुरूवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शरद लाड यांना ऑफर दिली होती.
मात्र शरद लाड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसात लाड समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा क्रांती कारखान्याच्या कार्यस्थळावर होणार आहे. त्यानंतर मंगळवारी त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.
sharad-lad-news-sharad-lad-joins-bjp-on-tuesday-bjp-will-get-candidate-for-pune-graduate
दरम्यान, पुणे पदवीधर विधानपरिषदेेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शरद लाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. हा मतदारसंघ 1990 ते 2002 पर्यंत भाजपच्या ताब्यात राहिला होता. 2002 च्या निवडणुकीत मात्र प्रा. शरद पाटील यांनी या मतदार संघातून विजय साकारला होता. तर 2008 च्या निवडणुकीत पुन्हा भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे विजयी झाली होते. पण 2020 ला भाजपला पुन्हा पराभवाचा धक्का बसला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











