संदीप इंगळे, शिरोळ
shirol election news : आमदार यड्रावकरांच्या पत्रकार बैठकीला बाबा पाटील यांची गैरहजेरी, फोडाफोडीने राजकीय खळबळ : आगामी शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीला आता चांगलीच रंगत आली असून राजकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी फोडाफोडीची मोहीम सुरू करत गणपतराव पाटील गटात मोठी फूट पाडली आहे.
shirol election news : आमदार यड्रावकरांच्या पत्रकार बैठकीला बाबा पाटील यांची गैरहजेरी, फोडाफोडीने राजकीय खळबळ
काँग्रेसचे नेते व श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक गणपतराव पाटील यांच्या जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा काळे यांना आपल्या गटात सामील करून घेत, त्यांच्या पत्नी श्वेता काळे यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केल्याने शिरोळच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे.
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार यड्रावकर यांच्या पत्रकार बैठकीला पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि यड्रावकरांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे प्रताप उर्फ बाबा पाटील गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे.गेल्या काही महिन्यांपासून बाबा पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून,त्यांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे.
शिरोळ नगरपरिषदेची निवडणूक तिरंगी होणार असून सर्वच आघाड्यांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे.यड्रावकरांनी केलेल्या हालचालींनी विकास आघाडीला बळ मिळाले असले तरी,त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या नाराजीमुळे समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.बाबा पाटील यांनी यड्रावकरांविरोधात भूमिका घेतली तर शिरोळमधील पाटील समाजाच्या मतांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
आमदार यड्रावकर आता नाराज सहकाऱ्यांना समजावून घेण्याच्या प्रयत्नात असून, बाबा पाटील यांची नाराजी दूर करण्यात त्यांना यश येणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आगामी काही दिवसांत या घडामोडींना आणखी वेग मिळण्याची चिन्हे आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











