shirol election news : शिरोळात राजकीय भूकंप, पाटील व यादव एकत्र 

SHARE:

संदीप इंगळे, शिरोळ

shirol election news : शिरोळात राजकीय भूकंप, पाटील व यादव एकत्र  : शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत आता खरी राजकीय चुरस रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.प्रभाग क्रमांक ९ मधून माजी नगरसेवक पद्मसिंह प्रकाशराव पाटील यांची यादव आघाडीकडून उमेदवारी घोषित झाल्याने शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

shirol election news : शिरोळात राजकीय भूकंप, पाटील व यादव एकत्र 

प्रभाग ९ मधून पद्मसिंह पाटील यांची यादव गटाकडून उमेदवारी घोषित

या निर्णयामुळे आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गोटात फोड पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.गत दोन दिवसांपासून शिरोळ शहरात फोडाफोडीचे राजकारण चांगलेच तापले आहे.मंगळवारी आमदार यड्रावकर यांनी गणपतराव पाटील यांचे विश्वासू व जनसंपर्क अधिकारी विश्वास (दादा) काळे यांच्या पत्नी श्वेता काळे यांना थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर करून मोठी राजकीय चाल खेळली होती.
या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर अनेकांचे समीकरण बिघडल्याचे दिसून आले.शिरोळ नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक ९ हा परंपरेने “बालेकिल्ला” मानला जातो.येथील निकालच सत्तेच्या समीकरणावर निर्णायक ठरतो,म्हणूनच सर्वच आघाड्यांचे आणि नेत्यांचे लक्ष या प्रभागाकडे असते.दरम्यान,शिरोळ नगर परिषदेमधील कारभारावरून आमदार यड्रावकर यांचे निकटवर्तीय आणि पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांची नाराजी असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती.
अखेर या नाराजीला मूर्त रूप मिळाले असून,त्यांच्या पुतण्याला म्हणजेच पद्मसिंह पाटील यांना यादव आघाडीकडून उमेदवारी मिळाल्याने शिरोळच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.या घडामोडींमुळे प्रताप (बाबा) पाटील यांनी आमदार यड्रावकर यांची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले असून,त्यांनी गणपतराव पाटील,माजी खासदार राजू शेट्टी आणि पृथ्वीराज यादव यांच्या यादव आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या हालचालीमुळे आगामी नगर परिषद निवडणुक रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.राजकीय समीकरणातील या नव्या कलाटणीमुळे प्रभाग ९ सह संपूर्ण शिरोळ नगर परिषदेतील निवडणूक आता अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *