tasgaon accident news : तासगावजवळ कार-दुचाकीच्या भीषण अपघातात बुर्लीचे तिघे ठार

SHARE:

आजी आजोबा व नातवाचा दुर्दैवी अंत, आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन परतताना घडली घटना

tasgaon accident news : तासगावजवळ कार-दुचाकीच्या भीषण अपघातात बुर्लीचे तिघे ठार : तासगाव- भिलवडी मार्गावरील तासगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर चेतना पेट्रोल नजीक वॅग्नार कार (एम एच 10 ई ए 6540) व दुचाकी (एम एच 10 बी 7174) यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार-वय-57, आशाताई शिवाजी सुतार-वय -55, वैष्णव ईश्वर सुतार- वय -5 (रा. बुर्ली ता. पलूस) येथील आजी आजोबा व पाच वर्षाचा नातू असे तिघेजण ठार झाले. तर, कार मधील चौघेजण गंभीर जखमी झाले. आदर्श शिक्षण पुरस्कार घेऊन परतताना हा अपघात घडला.

tasgaon accident news : तासगावजवळ कार-दुचाकीच्या भीषण अपघातात बुर्लीचे तिघे ठार

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास घडला. सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील चार शिक्षक वॅग्नर कारमधून कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले होते. यापैकी स्वाती अमित कोळी (रा, सांगलीवाडी) यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर हे शिक्षक कडेपूरवरून तासगावमार्गे सांगलीला परतत असताना हा अपघात घडला.

तासगावजवळ आल्यानंतर समोरून येणार्‍या दुचाकीशी कारची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्षबागेत कोसळली. या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार, आशाताई शिवाजी सुतार आणि त्यांचा पाच वर्षांचा नातू वैष्णव ईश्वर सुतार (रा. बुर्ली, ता. पलूस) यांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही काकडवाडी येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते.

वॅग्नर कारमधील चार शिक्षक पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सूरज पवार, स्वाती अमित कोळी आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने तासगाव आणि सांगली येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच तासगाव शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका तसेच पोलिसांना पाचारण केले. तासगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे तासगाव आणि पलूस तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. एका वृद्ध दांम्पत्यासह त्यांच्या पाच वर्षीय नातवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याशिवाय, पुरस्कार सोहळ्याहून परतणार्‍या शिक्षकांच्या कारला अपघात झाल्यानं शिक्षक समुदायातही दुख: व्यक्त केलं जात आहे.

tasgaon-accident-news-three-people-from-burli-died-in-a-terrible-car-two-wheeler-accident-near-tasgaon

दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समोरासमोर झालेल्या धडकेमुळे हा अपघात घडला. याचा अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *