tasgaon murdar news : दारूसाठी पैसे न दिल्याने तासगावात आईचा मुलाकडून तलवारीने खून: तासगावातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून मुलानेच जन्मदात्या आईचा तलवारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
tasgaon murdar news : दारूसाठी पैसे न दिल्याने तासगावात आईचा मुलाकडून तलवारीने खून
मृत महिलेचे नाव शांताबाई चरण पवार (वय 70, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव) असे असून, या प्रकरणी तिचा मोठा मुलगा उपकार्या चरण पवार यांनी आपल्या भावाविरुद्ध फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव जगणु उर्फ जगण्या चरण पवार (वय 45) असे आहे.
पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई या इंदिरानगर येथे एकट्या राहत होत्या. त्यांना आणि त्यांच्या मुलगा जगण्याला दारूचे व्यसन होते. मंगळवार, 14 ऑक्टोबर रोजी फिर्यादी पुण्याहून तासगावला आले होते. त्यांच्या पत्नी घरी नसल्याने आई शांताबाई त्यांच्याकडे राहात होत्या.
बुधवार 15 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास शांताबाई यांनी जेवण तयार केले होते. तेवढ्यात जगण्या पवार हातात तलवार घेऊन घरात आला आणि आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. आईने आता जा, नंतर बघू असे सांगताच त्याने रागाच्या भरात तिच्या केसांना पकडून जमिनीवर पाडले आणि तलवारीने तिच्या पोटावर, कानाजवळ तसेच बरगडीखाली वार करून तिचा जागीच खून केला.
फिर्यादी उपकार्या पवार हे अपंग असल्याने त्यांनी घराबाहेर येऊन इतरांना घटना सांगितली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, स.पो.नि. दीपक पाटील, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, विनय गोडसे व अन्य पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी आरोपी जगण्या पवारला ताब्यात घेतले असून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे करत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











