संजयकाका पाटलांच्या मॅच फिक्सिंग आरोपांमुळे खळबळ
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे आजपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अशातच महायुती म्हणून निवडणूक लढवण्यासाठी भाजप आग्रही असताना माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या आरोपामुळे खळबळ उडवून दिली आहे.
माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपचे मंत्री आणि खासदार विशाल पाटील यांच्यात चर्चा झाली असल्याचा आरोप करत ही मॅच फिक्सिंग झाली असल्याचा खळबळजनक दावा माजी खासदार पाटील यांनी केला आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत मॅच फिक्सिंगचं राजकारण सुरू आहे,असा आरोप माजी खासदार संजय काका पाटलांकडून करण्यात आला आहे. खासदार विशाल पाटील हे जिल्हा बँक निवडणुकीच्या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट होऊन चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट संजयकाका पाटलांनी केला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना आपण देखील भेटल्याचा संजयकाका पाटलांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यामुळे विशाल पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीच्या दाव्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये पॅनल होणार की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी,अशी लढत होणार,याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या भाजपा उमेदवाराला,खासदार विशाल पाटलांनी शुभेच्छा दिल्यावरून राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी संचालक राहुल महाडिक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी खासदार विशाल पाटलांनी राहुल महाडिक यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, महाडिक हे जयंत पाटलांचे कट्टर विरोधक आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाडिक बंधू हे जिल्हा बँकेत आले होते. यावेळी खासदार विशाल पाटलांनी महाडिक बंधूंची जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारावर भेट झाली. या भेटी दरम्यान विशाल पाटलांनी राहुल महाडिकांना पुष्पगुच्छ दिला, या शुभेच्छा वाढदिवसानिमित्त देण्यात आल्याचे असल्याचे सांगण्यात आलंय.
मात्र विशाल पाटलांच्या शुभेच्छा एक प्रकारे जयंत पाटलांच्या विरोधकांना पाठबळ स्वरूपी तर नाहीत ना ? अशी चर्चा रंगली आहे. अशातच माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलेल्या आरोपला यां प्रकारमुळे आणखीन बळ मिळाले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











