tung accident news : तुंगजवळ दुभाजकाला धडकून बुलेटवरून निघालेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी ठार : सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील तुंग येथे बुलेटवरून निघालेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची दुभाजकाला धडक बसल्यानंतर हेल्मेट फुटून तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी सकाळी घडली. ऋषिकेश दीपक माळी (वय 19, रा. पोद्दार स्कूलजवळ, विश्रामबाग, सांगली) असे मृत युवकाचे नाव आहे. अपघातप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
tung accident news : तुंगजवळ दुभाजकाला धडकून बुलेटवरून निघालेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी ठार
घटनास्थळी आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ऋषिकेश माळी हा ईश्वरपूर येथील महाविद्यालयात बी.टेक च्या पहिल्या वर्षात शिकत होता. बुधवारी कॉलेजचा शेवटचा दिवस असल्यामुळे ऋषिकेश हा त्याच्या अलिशान बुलेटवरून सकाळी ईश्वरपूरकडे निघाला होता. त्याचे दोन मित्र मागे होते. सकाळी 9 च्या सुमारास तुंग गावातून जात असताना त्याची बुलेट वेगात होती.
गावातील रविंद्र वस्त्रनिकेतनसमोर ऋषिकेशच्यासमोरून एक दुचाकी जात होता. समोरील दुचाकी आणि रस्ता दुभाजकामधून आपण पुढे जाऊ शकतो असे वाटल्याने त्याने वेगाने बुलेट नेली. परंतू त्याचा अंदाज चुकल्यामुळे तो रस्ता दुभाजकाला वेगाने धडकला. जवळपास 70 फुटापर्यंत फरफटत जाऊन दुभाजकावर असलेल्या साईन बोर्डला धडकला. यामध्ये त्याचे हेल्मेट फुटून डोक्यास अंतर्गत गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.
गावातील काहीजणांनी हा थरारक अपघात पाहिल्यानंतर त्यांचाही थरकाप उडाला. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली. पाठीमागून ऋषिकेशचे मित्र आले. 108 रूग्णवाहिका तत्काळ बोलवली. परंतू तोपर्यंत ऋषिकेश जागीच मृत झाला होता. अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी यांनी भेट देऊन माहिती घेतली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










