महावीर रावसाहेब पाटील यांना मिळाला मान
valiwade jain samaj news : वळीवडे येथील यजमानपदाचा सवाल 45 लाख 14 हजार 141 रूपये : कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे येथील श्री 1008 भगवान पार्श्वनाथ जैन मंदिराच्यावतीने 14 एप्रिल ते 19 एप्रिल अखेर होणार्या पंचकल्याणक पुजेसाठी यजमान पदाचा मान जैन समाज वळीवडेचे अध्यक्ष महावीर रावसाहेब पाटील यांना मिळाला. 45 लाख 14 हजार 141 रूपयांची बोली लावून त्यांनी सौधर्म इंद्र इंद्रायणीचा मान मिळविला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
valiwade jain samaj news : वळीवडे येथील यजमानपदाचा सवाल 45 लाख 14 हजार 141 रूपये
गांधीनगर जवळ असलेल्या वळीवडे येथे एप्रिल महिन्यात आचार्य 108 प. पू. चंद्रप्रभूसागरजी महाराज यांच्या आशीर्वादाखाली होणार आहे. त्यासाठी रविवार 16 फेब्रुवारी रोजी सवालाचा कार्यक्रम झाला.

महावीर रावासाहेब पाटील यांच्या सोबतच ईशान्य इंद्रचे मानकरी कुलभूषण आण्णासो चौगुले यांना मिळाला.
21 लाख 21 हजार 121 रूपयाची बोली त्यांनी लावली. तीथर्र्कर माता पिता होण्याचा मान सौ. मिनाक्षी उत्तम चौगुले मुंजाप्पा यांना मिळाला. सुवर्ण सौभाग्यवतीचा मान पूजा अनिकेत चौगुले यांना मिळाला. त्यांनी 23 लाख 23 हजार 323 रूपयांची बोली लावली.
धनपती कुबेर इंद्राचा सवाल संदेश आप्पासो दिगंबरे यांना मिळाला.
त्यांनी 1 लाख 11 हजार 111 रूपयांची बोली लावली. महायज्ञनायकचा मान सन्मत महावीर चौगुले यांना मिळाला. त्यांनी 7 लाख 77 हजार 777 रूपयांची बोली लावली.

अष्टकुमारीकेचा मान मधुरा हुल्ले 3 लाख 75 हजार 575, सानिका चौगुले 3 लाख 33 हजार 333, श्रुती हुल्ले 2 लाख 51 हजार 151 , मधुरा पाटील 2 लाख 51 हजार 151 , साक्षी पाटील 2 लाख 22 हजार 222 , प्राची चौगुले 1 लाख 75 हजार 175 , समिक्षा चौगुले 1 लाख 75 हजार 175, प्रेरणा चौगुले 2 लाख 41 हजार 141 यांना मिळाला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



