प्रसंगी निवडणूक बिनविरोधासाठी पुढाकार घेवू

SHARE:

प्रसंगी निवडणूक बिनविरोधासाठी पुढाकार घेवू

विरोधकांनी आव्हान दिले तर ताकद दाखवू ः आ. विश्वजीत कदम

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक खेळीमेळीमध्ये व्हावी, हा आमचाही प्रयत्न आहे. परंतु विरोधक जर निवडणुकीचाच प्रयत्न करीत असतील तर आम्हीही ताकद पणाला लावू. जर निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्हीही त्यासाठी पुढाकार घेऊ, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर दिला.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी यावेळी प्रथमच आ. कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी कडेगाव तालुक्यातील विकास सोसायटी गटातून जेष्ठ संचालक व माजी आ. मोहनराव कदम हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. कदम यांच्या वयोमानानुसार त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी यावेळी आ. डॉ. कदम हे कडेगाव तालुक्यातील सोसायटी गटातून रिंगणात उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
आ. डॉ. कदम म्हणाले, सहकाराचा कणा असलेल्या जिल्हा बँकेची ही निवडणूक खेळीमेळीमध्ये व्हावी हा आमचाही प्रयत्न आहे. जर विरोधक निवडणुकीसाठी प्रयत्न करत असतील तर आम्ही आमची ताकद या निवडणुकीत पणाला लावू. निवडणूक बिनविरोध होत असेल तर आम्हीही त्यासाठी पुढाकार घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या बाहेरून खूप काही बोलता येते. जिल्हा बँक ही आर्थिक संस्था असून खूप लोकांचा आयुष्य यावर अवलंबून आहे. सहकारातील महत्वाची संस्था असलेल्या बँकेबाबत लोकांनी विचार करुन आरोप केले पाहिजेत. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी संस्थेला अडचणीत आणू नये. जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती खूप भक्कम आहे, कोणाचाही घोटाळा यात झालेला नाही. राज्यातील पहिल्या पाच बँकांमध्ये सांगली जिल्हा बँकेचा समावेश आहे, ती संस्था कायमस्वरुपी भक्कमपणे उभी राहिली पाहिजे, आम्ही जिल्हा बँकेसाठी चर्चा करीत आहे. चर्चा ही राजकारण विरहित होईल, यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे आ. कदम यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *