zp election news : जिल्हा परिषदेच्या गट, गण प्रारूप रचनेवर दाखल झालेल्या 12 हरकती फेटाळल्या

SHARE:

zp election news : जिल्हा परिषदेच्या गट, गण प्रारूप रचनेवर दाखल झालेल्या 12 हरकती फेटाळल्या: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट, गण प्रारूप रचनेवर दाखल झालेल्या 19 हरकतींवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निर्णय दिला. वाळवा तालुक्यातील एक हरकत पूर्ण मान्य, एक अंशत ः आणि आटपाडी तालुक्यातील पंचायत समिती गणाबाबत पाच हरकती अशंता मान्य करण्यात आल्या. उर्वरित 12 हकरती फेटाळण्यात आल्या.

zp election news : जिल्हा परिषदेच्या गट, गण प्रारूप रचनेवर दाखल झालेल्या 12 हरकती फेटाळल्या

पुणे आयुक्त कार्यालयात झालेल्या सुनावणीवेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, सर्व तहसीलदार आणि तक्रारदार उपस्थित होते. जिल्हा परिषद गटासाठी 16 व पंचायत समितींच्या गणातील तीन हरकतींचा समावेश होता. आटपाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट 6, 1 गण, जत तालुक्यात गट 1, गण 1, तासगाव तालुक्यामध्ये गट 2, कवठेमहांकाळ तालुक्यात 1 गट, वाळवा तालुक्यात गट 2, गण 1 आणि मिरज तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी 4 हरकती दाखल झाल्या होत्या.

दाखल झालेल्या हरकतीपैकी आटपाडी तालुक्यातील माडगुळे गणातील पुजारवाडी, देशमुखवाडी या दोन गावांचा विठलापूर गणात समावेश करण्यात आला आहे. या गावाबाबत दाखल झालेल्या हकरत विभागीय आयुक्तांनी मान्य केल्या आहेत. या गावाबाबत एकूण पाच हरकती दाखल झाल्या होत्या, त्या सर्व अंशत ः मान्य करण्यात आल्या आहेत.

तसेच वाळवा तालुक्यातील बावची गटातील भडकंबे गावचा समावेश येलूर गटात करण्यात आला आहे. तसेच ढवळी गावाचा येलूर गटातून बावची गटात समावेश करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे. उर्वरित 12 हकरती फेटाळल्या आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *