dhananjay munde news : धनंजय मुंडेचे मुंबईत १६ कोटीचं घर तरीही शासकीय बंगला सोडला नाही :राष्ट्रवादी काॅँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्री पदाचा राजीनामा देऊन अनेक महिने झाले तरी त्यांनी शासकीय बंगला अद्याप सोडला नाही. त्यावरून शासनाने त्यांना ४२ लाखाचा दंडही ठोठावला. मुंबईत घर नसल्याने आपण बंगला सोडला नसल्याचे सांगितले मात्र, त्यांचे मुंबईत १६.५ कोटी रुपयांना खरेदी केलेले २१५१ चौरस फुटांचे घर असल्याचे समोर आले आहे. असे असतानाही त्यांनी शासकीय बंगला सोडला नाही यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
dhananjay munde news : धनंजय मुंडेचे मुंबईत १६ कोटीचं घर तरीही शासकीय बंगला सोडला नाही
या संदर्भात धनंजय मुंडे यांनी विचारता त्यांनी आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे. माझ्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. त्यामुळे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मी मुदतवाढ मागितली आहे. असे सांगितले. तसेच याआधी अनेक माजी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे असे ते म्हणाले. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला देण्याचा शासकीय आदेश २३ मे रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
मुंबईतील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्या योग्य नसून, त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणे गरजेचे आहे. मात्र या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे, माझा शोध ही सुरु आहे. माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून, तशी शासनाकडे विनंती केली आहे. असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










