dudhgaon news : वडिलांच्या डोळ्यासमोरच तरूण मुलाचा मृत्यू दुधगाव हादरलं….

SHARE:

dudhgaon news : वडिलांच्या डोळ्यासमोरच तरूण मुलाचा मृत्यू दुधगाव हादरलं…. : जगात कुणीही अमर नाही पण वडिलांच्या डोळ्यांदेखत तरुण मुलाचा मृत्यू – याहून मोठं दु:ख कोणतं?** या जगात जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मृत्यू अटळ आहे, हे सत्य सर्वांनाच माहीत आहे. पण मृत्यूही काही नियम पाळतो

तो वृद्धाला यावा, आजारी माणसाला यावा, आयुष्य जगून थकलेल्याला यावा-
पण वयात आलेल्या, स्वप्नांनी भरलेल्या तरुणाला, तेही वडिलांच्या डोळ्यांदेखत?
याहून क्रूर प्रसंग दुसरा कोणता असू शकतो?
असाच काळजाचा ठाव घेणारा प्रसंग मिरज तालुक्यातील दुधगाव येथे घडला आहे-
ज्याने संपूर्ण गावाचं आकाश काळवंडून टाकलं आहे.

विजय आडमुठे-
सांद्रे परिसरातील एक प्रगतशील शेतकरी.
सर्वांशी मिळून-मिसळून राहणारे,
गावात कुणाच्या सुखात आनंदाने धावणारे,
आणि कुणाच्या दुःखात शब्द न बोलता खांदा देणारे.
चेहर्‍यावर कायम हसू, बोलण्यात मृदुता आणि वागण्यात माणुसकी-
असे विजय आडमुठे आज स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात सहन करत आहेत.

त्यांचा मुलगा-
विशाल विजय आडमुठे.
अवघा 26 वर्षांचा.
तरुणाईत नुकताच पाऊल ठेवलेला.
डोळ्यांत स्वप्नं, मनात आत्मविश्वास आणि हृदयात वडिलांसाठी अपार प्रेम.
बाबांचं नाव मोठं करायचंय
हा विचार त्याच्या प्रत्येक श्वासात होता.
कुणाच्या अध्यात-मध्यात नाही,
कुणाशी वैर नाही,

तोही वडिलांसारखाच हसतमुख, दिलखुलास.
बगॅसपासून कोळसा कांडी बनविण्याचा उद्योग सुरू करण्याचं स्वप्न त्याने पाहिलं.
वडिलांना सांगितलं
आणि त्या बापानेही क्षणाचाही विचार न करता म्हणालं-
कर मी तुझ्या पाठीशी आहे.
जागा घेतली गेली.

मशिनरी आणली.
शेड उभारलं.
लाईट कनेक्शन घेतलं.
संक्रांत, क्रांतीनंतर उद्योग सुरू होणार होता.
घरात आनंदाची चाहूल लागली होती.
भविष्यासाठी आशा फुलत होत्या.
पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं

उद्योग सुरू होण्याआधी शेडजवळ ठेवलेली अवजड मशिनरी आत हलवायची होती.
साधारण दोन ते अडीच टन वजनाचं मशीन.
चार-पाच जण जमले.
थोडं थोडं पुढे सरकवण्याचा प्रयत्न सुरू होता.
मशीन एक फूट पुढे गेलं.
आणखी एक फूट गेले असते,
तर काम पूर्ण झालं असतं
पण त्याआधीच
काळाने घाला घातला.

ज्या मशीनच्या आधारावर उद्याचं आयुष्य उभं राहणार होतं,
ज्या मशीनवर विशालने आपली स्वप्नं रचली होती-
तेच मशीन अचानक त्याच्या डोक्यावर कोसळलं.
क्षणात सगळं संपलं.
वडिलांच्या डोळ्यांदेखत
त्यांचा एकुलता एक आधार
त्यांच्या हाताखालून निसटून गेला.
त्या क्षणी

विजय आडमुठेंना काय घडतंय हेच कळलं नाही.
पण वेळ
वेळ मात्र थांबली नाही.
तिने आपलं काम करून घेतलं.
क्षणभरात
हसतमुख विशाल
कायमचा निघून गेला.
गाव सुन्न झालं.
डोळे भरून आले.

आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच वाक्य होतं-
अशी वेळ वैर्‍यावरही येऊ नये
एका बापाचं आयुष्य
एका क्षणात उद्ध्वस्त झालं.
स्वप्नांची राख झाली.
आणि दुधगावच्या मातीत
एक निष्पाप तरुण कायमचा झोपला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *