sangli election : शुक्रवारी मिरजेत मतमोजणी; दोन-तीन फेर्या, एकावेळी सहा प्रभागांची होणार मतमोजणी : महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार दि. 16 रोजी मिरजेतील शासकीय गोदामात होणार आहे. सहा सहाय्यक निवडणूक अधिकार्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे एकावेळी सहा प्रभागाची मतमोजणी होणार आहे. 6, 9, 14 व 16 प्रभागात तीन तर 16 प्रभागांमध्ये दोन फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
sangli election : शुक्रवारी मिरजेत मतमोजणी; दोन-तीन फेर्या, एकावेळी सहा प्रभागांची होणार मतमोजणी
प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. मिरज शासकीय गोदाम येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. सहा निवडणूक क्षेत्रीय कार्यालयनिहाय मतमोजणीची व्यवस्था केली आहे. एकावेळी सहा प्रभागाची 14 टेबलावर मतमोजणी होणार आहे. ज्या प्रभागाची मतमोजणी सुरू आहे, तेथील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल. उमेदवार व प्रतिनिधींना मोबाईल बंदी आहे. मोबाईल आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल. प्रभाग 6, 9, 14 व 16 या चार प्रभागात तीन फेर्या तर उर्वरित 16 प्रभागात 2 फेर्यात मतमोजणी होणार आहे.
मिरजेतील शासकीय गोदामात स्ट्राँग रुम उभारण्यात आले असून तिथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. फायर अलार्म आणि पेस्ट कंट्रोल प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. स्ट्राँग रुमच्या बाहेर 50 तर आतमध्ये 10 ते 15 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून ते 24 तास सुरू आहेत.
अशी होणार प्रभागांची मतमोजणी
महापालिकेच्या मतमोजणीसाठी प्रथम प्रभाग क्रमांक 1, 3, 5, 15, 12 व 9 ची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होईल. त्यानंतर प्रभाग क्रमांक 2, 4, 7, 17, 13 व 10 ची मतमोजणी होईल. ही पूर्ण झाल्यानंतर तिसर्या टप्प्यात प्रभाग क्रमांक 8, 6, 20, 18, 14 व 11 ची मतमोजणी होईल. शेवटी प्रभाग क्रमांक 16 ची मतमोजणी होण्याची शक्यता आहे. साधारण साडेतीन ते चार तासात सर्व मतमोजणी पूर्ण होईल.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











