kasbe digraj crime news : कसबेडिग्रजमध्ये तिघांना रॉड आणि कोयत्याने केली बेदम मारहाण : सहा जणांवर गुन्हा दाखल.

SHARE:

kasbe digraj crime news : कसबेडिग्रजमध्ये तिघांना रॉड आणि कोयत्याने केली बेदम मारहाण : सहा जणांवर गुन्हा दाखल. : सांगली : मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज मध्ये मुलाने मॅसेज केलेला वाद मिटवायचा आहे असे सांगून सहा जणांनी मिळून लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीचा प्रकार हा बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी कुमार बापू दुधगावे (वय 61 रा. कसबेडिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

kasbe digraj crime news : कसबेडिग्रजमध्ये तिघांना रॉड आणि कोयत्याने केली बेदम मारहाण : सहा जणांवर गुन्हा दाखल.

त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या ओंकार नलवडे, अजित नलवडे, अनिल नलवडे, अविनाश नलवडे, उत्तम नलवडे, दुर्वास नलवडे (सर्व रा. कसबेडिग्रज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी कुमार दुधगावे हे आपल्या कुटुंबियांसह कसबेडिग्रज गावामध्ये राहतात. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संशयितांनी तुमच्या मुलाने मॅसेज केलेला वाद मिटवायचा आहे असे म्हणून कुमार दुधगावे, त्यांचा मुलगा रोहित दुधगावे यांना ऐश्वर्या पेट्रोल पंपाजवळील कारखाना ऑफिस येथे बोलावून घेतले. काहीही एक न विचारात सर्वांनी संगनमत करून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली.

कुमार दुधगावे यांच्या डोक्यात अविनाश नलवडे याने लोखंडी रॉडने मारहाण केली. कुमार यांचा भाऊ दीपक दुधगावे यांच्या हातावर कोयत्याने वार केले. रोहित याला काठीने बेदम मारहाण केले. घडलेल्या या प्रकारानंतर जखमी कुमार दुधगावे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्‍या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *