nandani elephant news : नांदणी दगडफेक प्रकरणातील 32 जणांना जामीन मंजूर;

SHARE:

nandani elephant news : नांदणी दगडफेक प्रकरणातील 32 जणांना जामीन मंजूर; : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथे माधुरी हत्तीला वनतारा प्रकल्पात हलवण्याच्या निर्णयाला विरोध करताना झालेल्या दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 39 पैकी 32 जणांना आज (दि. 4) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.

nandani elephant news : नांदणी दगडफेक प्रकरणातील 32 जणांना जामीन मंजूर;

माधुरी हत्तीला वनताराला नेण्यावरून झाला होता तणाव

नांदणी येथील ऐतिहासिक जैन मठातील माधुरी हत्तीला वनतारा प्रकल्पात हलवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गावकर्‍यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. माधुरी हत्तीला वनताराला घेऊन जात असताना जमावाने पोलिसांना विरोध करत दगडफेक केली होती. या घटनेत 14 पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. तसेच 7 शासकीय वाहनांचे नुकसान झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात ओळख पटलेल्या 39 जणांसह अज्ञात 125 जणांवर गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या 39 पैकी 32 जणांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उर्वरित आरोपींच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे. माधुरी हत्तीला वनताराला हलवण्याच्या निर्णयाला नांदणी गावकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. गावकर्‍यांनी ’आमची माधुरी आम्हाला परत द्या’ अशी मागणी केली आहे. गावकर्‍यांनी भव्य मोर्चा काढून या निर्णयाचा निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *