nandani elephant on ambanis vantara : अंबानींच्या वनतारा प्रकल्पाविरोधात देशभर वणवा; आंतरराष्ट्रीय दबावाची चिन्हे!: कोल्हापूरच्या मातीवरून उसळलेला माधुरी हत्ती वाद आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. सांगली-कोल्हापूरातील संताप आता राज्यभर पसरत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू लागला आहे.
nandani elephant on ambanis vantara : अंबानींच्या वनतारा प्रकल्पाविरोधात देशभर वणवा; आंतरराष्ट्रीय दबावाची चिन्हे!
परदेशात नोकऱ्या आणि व्यवसाय करणारे मराठी तरुण सोशल मीडियावर ‘माधुरीला न्याय मिळवा’ मोहिमेत मोठ्या प्रमाणावर उतरले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि यूट्यूबवरून या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. थेट भावनिक पोस्ट, व्हिडिओ मेसेजेस आणि उघड बहिष्काराच्या हाकांनी अंबानींच्या वनतारा प्रकल्पावर तुफान टीकेचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, या आंदोलनाने रिलायन्स समूहाच्या व्यवसायालाही थेट टार्गेट केले आहे. जिओ सिम, जिओ फायबर आणि जिओ-बिपी पेट्रोल पंपांवर बहिष्कार मोहीम सुरू झाली असून, #BoycottJio आणि #SaveMadhuriElephant हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. जनतेचा हा राग पुढील काळात अंबानी कुटुंबावर मोठा आर्थिक दबाव आणू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सामाजिक संस्था, प्राणीप्रेमी संघटना आणि परदेशातील मराठी संघटना देखील आता या आंदोलनात उघडपणे सहभागी होत आहेत. संपत्ती आणि साम्राज्याच्या बळावर चालवले जाणारे प्रकल्प जनतेच्या भावनांना न जुमानता किती दिवस टिकतील, हा मोठा प्रश्न अंबानींसमोर उभा राहिला आहे.
nandani-elephant-on-ambanis-vantara-nationwide-outcry-against-ambanis-vantara-project-signs-of-international-pressure
या संघर्षातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे—
“जनतेचा आवाज आणि प्राण्यांच्या रक्षणासाठी पेटलेली भावना, ही कुठल्याही उद्योगसाम्राज्यापेक्षा मोठी आहे!”
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










