pratik patil news : इस्लामपूरकरांनी अनुभवला रस्सीखेचचा थरार: इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्याचे युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रस्सीखेचचा जोरदार थरार इस्लामपूरकरांनी अनुभवला. रोमहर्षक सामने..प्रेक्षकांची अलोट गर्दी,हलगी घुमक्याचा ठेका आणि डीजेच्या दणदणाटात ही स्पर्धा पार पडली.
pratik patil news : इस्लामपूरकरांनी अनुभवला रस्सीखेचचा थरार
.युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते सकाळी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला..सुमारे 10 तास ही स्पर्धा चालली..यावेळी प्रतिकदादा पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला..माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. प्रेक्षणीय सामन्यात माजी नगरसेवक संघाने कारखाना संचालक संघावर,तर महिला राष्ट्रवादीच्या शहर संघाने तालुका महिला राष्ट्रवादी संघावर मात केली.
या स्पर्धेत स्वरूप मोरे यांच्या बूथ क्रमांक 96 ने प्रथम क्रमांक पटकाविला.
संभाजी बाबर यांच्या बूथ क्रमांक 123 ने दुसरा, सदानंद पाटील यांच्या बूथ क्रमांक 82 ने तिसरा,तर धनंजय बामणे यांच्या बूथ क्रमांक 84 ने चौथा क्रमांक पटकाविला. साधारण 50 संघांनी स्पर्धेत सहभागी घेतला..राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना अनुक्रमे रुपये 51 हजार,रुपये 31 हजार,रुपये 21 हजार व रुपये 11 हजार,तसेच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संजय पाटील,शंकरराव चव्हाण,बाळासो कोळेकर, संदीप माने प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा.शामराव पाटील,बाळासाहेब पाटील, देवराज पाटील,विजयराव पाटील,खंडेराव जाधव,सुभाषराव सुर्यवंशी, दादासाहेब पाटील,संदीप पाटील,विजयराव यादव, माणिक पाटील,शशिकांत पाटील, संदीप पाटील,शंकरराव पाटील,सुनिता देशमाने, पुष्पलता खरात,संग्राम जाधव,देवराज देशमुख यांच्यासह जेष्ठ,युवक व महिला पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष शहाजी पाटील,रणजित गायकवाड,सचिन कोळी,अभिजीत पाटील, राजेंद्र बाणेकर,स्वरूप मोरे,विजय देसाई (सोन्याबापू),दिग्विजय पाटील,गुरुराज माने,सुहास पाटील,धीरज भोसले,सूर्याजी पाटील,अंकुश जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यास परिश्रम घेतले. ए.एस.पाटील,पी. टी.पाटील,एन.डी.पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. आर.ए.पांढरबळे,आर.बी. बल्लाळ यांनी समालोचन केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











