सांगली शहर, संजयनगर, ग्रामीण पोलिसांची कारवाई.
गणेश विसर्जनाच्या सातव्या दिवशीच्या मिरवणुकीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करता डॉल्बचा दणदणाट करणार्या 12 मंडळांच्या अध्यक्षांसह डॉल्बी चालक अशा 24 जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. आवाजाची मर्यादा न पाळता साउंड सिस्टीम लावल्या प्रकरणी सांगली शहर, संजयनगर आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी सदरची कारवाई केली.
पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासह सर्वच अधिकार्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेश मंडळ, साऊंड सिस्टीम चालक, नागरिक आदींच्या बैठका घेवून त्यांना उत्सव कालावधीत आवाजाची तीव्रता कायद्याच्या चौकटीत ठेवावी असे आवाहन केले होते. याचा कोणी भंग केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन आवाज वाढविण्याचा फटका कार्यर्त्यांना बसला आहे. सातव्या दिवशी निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शहर पोलिसांनी मैत्रीचा गणेशोत्सव मंडळ, समर्थ चौक, सांगली, शिवराज्य ग्रुप कला व क्रीडा मंडळ गणपती पेठ, लोकमान्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पत्रकारनगर, सहारा गणेशोत्सव मंडळ शामरावनगर, मोरया प्रतिष्ठान राम नगर तर संजयनगर पोलिसांनी ओम गणेशोत्सव मंडळ नेहरूनगर मंडळाचे अध्यक्ष रोहन विठ्ठल ठोंबरेकर डॉल्बी मालकाचे नाव संदीप बंडू पवार, श्री साई होळकर चौक मंडळाचे अध्यक्ष सतीश रमेश फडतरे, डॉल्बी मालक साहिल अनिल पाटील, न्यू साई फ्रेंड सर्कल राजीवनगर मंडळाचे अध्यक्ष राजू संगप्पा इंगळे डॉल्बी मालक अमित आबा वाघमारे, शिवगर्जना मित्रमंडळ अष्टविनायकनगर मंडळाचे अध्यक्ष आकाश बजरंग देवकाते डॉल्बी मालक रमजान जहागीर मुजावर, आदर्श शांती गणेशोत्सव मंडळ लक्ष्मीनगरचे अध्यक्ष सिद्धू येनिलवाड डॉल्बी मालक महेश सुरेश वारे आणि श्री साई गजानन उत्सव मंडळ अष्टविनायकनगरचे अध्यक्ष बिरदेव पांडुरंग कोळेकर आणि डॉल्बी मालक अविनाश अशोक केसरकर यांच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. दुसरीकडे बुधगाव येथील बाल गणेश चौकात शनिवारी रात्री 9 च्या सुमारास नवयुग मित्र मंडळाची गणेश मिरवणूक आली असता त्याचा आवाज क्षमतेपेक्षा अधिक होता. ही बाब संबंधितांच्या लक्षात आणून दिल्यावर देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी, मंडळाचे अध्यक्ष दिपक शिवाजी भगत, उपाध्यक्ष अरविंद पांडुरंग पाटील, पदाधिकारी गजानन संपतराव भगत, प्रमोद शरद पाटील (सर्व रा. बुधगाव, ता. मिरज), साम्राज्य ऑडिओ डॉल्बीचे मालक विवेक सुनील भोसले ( रा. फलटण, ता. सातारा), ऑपेटर सनी सुजित चौगुले (रा. फलटण) आणि ट्रॅक्टर मालक कृष्णात विलास पाटील (रा. बुधगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











